Sunday, 23 March 2014

rendevevous

रांदाझेवास,
"आजची डिनर पार्टी रांदाझेवास मध्ये आहे" " क्लायंटचा म्यनेजर सांगत होता. आम्ही तर सगळे पुरते गोंधळून गेलो होतो. "सर,आपल्याला पार्टीला जायला उशीर होतो आहे. प्लीज, त्याला स्पेलिंग विचारा ना" आमचा प्रोजेक्ट म्यनेजर मला सुचवत होता.
रात्रीचे आठ वाजून गेले होते. आम्हाला काळजी आणि अवघडल्या सारखे वाटत होते. उशिरा पोचल्यावर काय कारण सांगणार? taxi उशिरा आली, रस्ता सापडला नाही, खूप ट्फिक होते, काय काय सांगावे याचाच विचार येत होता.
"चला प्रत्येकाने गुगल करा, रांदाझेवास सापडताय का शोधूया." सगळे टीम मेम्बर्स पार्टीचा मूड बाजूला ठेवून शोधू लागले. "Your search - randazevas - did not match any document " - सर प्रत्येक वेळी असेच येताय.
या सिंगापूर मध्ये कुठे शोधणार रांदाझेवास? वेळ निघून जात होती. आमच्या हॉटेलं लॉबी ऑफिसरला गाठले"एमी,प्लीज सिंगापूरमधल्या आर या अक्षरापासून सुरु होणाऱ्या पब्सची नावे सांग"- मी तर एसीपी प्रद्युमन प्रमाणे हुकुम सोडला. एमीची टेप चालू झाली. "वेट वेट!तू काय म्हणालीस? रासपुतीन?" अरे हेच नाव असणार. आपण रांदाझेवास ऐकले. झाले, माझा स्वतः वरचा विश्वास डळमळू लागला.
"एमी, लास्ट ट्राय.पुढची नावे सांग" - मी
"रोरिंग पांडा,रिवर व्यू, रान्देवू" - एमी
"एमी, हे रान्देवू पब कुठाय? - मी
"रान्देवू पब सरंगून रोडवर आहे" एमी
"चला रान्देवू पब मध्ये फोनच करू. गणपती बाप्पा मोरया"
अहो आश्चर्यम ! पबचे नाव रांदाझेवास नसून रान्देवू आहे हे तासाभराच्या झटापटी नंतर कळले. आमच्या थोर इंडोनेशियन क्लायंटने rendevevous याचा शब्दशः उच्चार करून आमची पंचाइत केली

2 comments:

  1. Its great that you started your blog!!!!

    Next step is to decorate your blog... good visuals, good fonts etc.
    Please let me know if you need any help on blog templates.
    Keep writing!!!

    ReplyDelete
  2. Manju, Thanks. I want to learn

    ReplyDelete